2024 मध्ये भाजपचा पराभव शक्य; प्रशांत किशोर यांनी सांगितला मास्टर प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज आहे असे मत राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. प्रशांत किशोर यांनी याबाबत आकडेवारीच गणितच मांडले. इतकचं नव्हे तर त्या आघाडीला मदत करायची आपली इच्छा असल्याचं देखील किशोर यांनी म्हटलंय.

2024 मध्ये भाजपला पराभूत करू शकणारी विरोधी आघाडी उभी करणं हे पूर्णपणे शक्य आहे. येत्या महिन्यात होत असलेल्या पाच राज्यांतील निवडणुका या एकप्रकारे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीची सेमी फायनलच असून त्यातील आकडे जरी प्रतिकूल आले तरीही ही आघाडी २०२४ ला विजयी होऊ शकते, असं विधान त्यांनी केलंय.

तुम्ही जर बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. भाजपा या ठिकाणी फक्त ५० च्या आसापासच जागा जिंकू शकलीय. त्यामुळे तृणमूल काँग्रेस किंवा अन्य एखादा पक्ष अथवा या पक्षांचा एकमेकांमध्ये ताळमेळ बसून एक आघाडी तयार होणार असेल तर त्यांनी एकत्रित येऊन आम्ही २०० पैकी १०० जागा जिंकणार असा निश्चय केल्यास विरोधी पक्षांना त्यांच्या लोकसभेमधील जागा २५०-२६० पर्यंत वाढवता येतील,” असंही प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त करताना म्हटलंय.

Leave a Comment