बीजिंग । सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन Hollywood actor Jackie Chan) कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (Communist Party of China) मध्ये दाखल होऊ शकतो. जॅकी चॅनने चीनच्या कम्युनिस्ट पार्टी (CPC) मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी या अभिनेत्याने हाँगकाँगमधील चीनच्या दडपशाही धोरणांनाही पाठिंबा दर्शविला आहे. जॅकी चॅनने एका पत्रकार परिषदेत हे संकेत दिले.
या परिषदेत चिनी चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांनी 1 जुलै रोजी पक्षाच्या स्थापना दिनावर अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेल्या संबोधनावर आपले विचार मांडले. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, चिनी फिल्म इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष चान यांनी देखील या पार्टीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. चान म्हणाले, “मी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा मोठेपणा पाहू शकतो. माझा विश्वास आहे की, ते (पक्ष) त्यांचे म्हणणे पूर्ण करतात आणि शंभर वर्षांत जे देण्याचे वचन देईल ते काही दशकांतच पूर्ण करतात. त्यामुळे मला CPC चा सदस्य व्हायचे आहे.
चान हे अनेक वर्षांपासून सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहेत. त्यांनी पक्षाच्या नियुक्त तज्ञांची सल्लागार संस्था चिनी पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टिव्ह कॉन्फरन्सिव्हचे सभासद म्हणूनही काम केले आहे. मार्शल आर्ट तज्ज्ञ अभिनेत्याने 2019 मध्ये हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनाचा विरोध केला, त्यासाठी त्याला टीकेचा सामना देखील करावा लागला.
चान म्हणाले, “मी अनेक देशांमध्ये गेलो आहे आणि असे म्हणू शकतो की, अलिकडच्या वर्षांत आपला देश वेगाने विकसित झाला आहे. मी जिथेही गेलो तिथे मला चीनी असल्याचा मला अभिमान वाटला आणि पंचतारांकित लाल ध्वजाला जगभरात सन्मान मिळतो आहे. ”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा