जॅकलिन फर्नांडिस 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात झाली फसवणुकीची शिकार, बनली ED ची साक्षीदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ज्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी झाली आहे त्याच रॅकेटची शिकार झाली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात तिची भागीदार लीना पॉलच्या माध्यमातून आली. असे म्हटले जाते की, सुकेश चंद्रशेखर नेत्याचे नातेवाईक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून श्रीमंतांची फसवणूक करायचे.

एनडीटीव्हीने ED च्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “जॅकलिन आरोपी नाही, परंतु गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार म्हणून तिची चौकशी केली जात आहे.” यामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली. सुकेशने बॉलिवूडच्या आणखी एका टॉप अभिनेत्रीला लक्ष्य केल्याचे तपासात उघड झाले आहे, सुरक्षेच्या कारणामुळे या अभिनेत्रीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

तपास एजन्सीने 24 ऑगस्ट रोजी सांगितले होते की,”त्यांनी चंद्रशेखरच्या विरोधात चेन्नईतील समुद्राच्या बाजूचा बंगला, 82.5 लाख रुपये कॅश आणि डझनभर लक्झरी कार जप्त केल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुकेश आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि 200 कोटी रुपयांची खंडणी केल्याप्रकरणी FIR नोंदवला होता.

अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की,”सुकेश चंद्रशेखर हा या फसवणुकीचा मास्टरमाईंड आहे. त्याच्याविरोधात अनेक FIR दाखल आहेत आणि तो सध्या रोहिणी तुरुंगात आहे. चंद्रशेखरला 2017 मध्ये निवडणूक आयोगाच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. AIADMK (अम्मा) नेते टीटीव्ही धिनाकरन यांच्याकडून निवडणूक चिन्हासंदर्भात पैसे घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता जेणेकरून ते आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देऊ शकतील.

Leave a Comment