हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांचे जीवनशैली बदलल्याने त्यांचे वजन देखील झपाट्याने वाढत आहे. आणि या झपाट्याने वाढणाऱ्या वजनामुळे सगळे त्रस्त आहेत. हे वजन नक्की कसे कमी करायचे? याबद्दल सगळेच रोज नवीन उपाय शोधत आहेत. परंतु खराब जीवनशैली, अपुरी झोप, आहारात बदल, फास्ट फूडचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणा वाढलेला आहे. लठ्ठपणा वाढला की, लठ्ठपणासोबत रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार देखील येतात. अनेकवेळा लोक वजन कमी करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल करतात. ते त्यांच्या जेवनातून चपाती, भात, गोड पदार्थ, तेलकट पदार्थ आणि मुख्य म्हणजे साखर बाजूला करतात. हे पदार्थ खाल्ले की वजन वाढते असे त्यांचा म्हणणे असते.
मधुमेह त्याचप्रमाणे लठ्ठ लोकांना आहारात साखर ऐवजी गूळ खाण्याचा सल्ला देतात. परंतु आरोग्यासाठी साखर आणि मध किती गुणकारी आहे? याने वजन कमी होते का हे आपण जाणून घेऊया.
मध खाण्याचे फायदे
आपल्याला जर नैसर्गिकरित्या गोड खायचे असेल, तर मध हा एक उत्तम पर्याय आहे. अनेकवेळा लोक वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पितात. मधामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतात. जे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करतात. त्यामुळे मध खाणे हे आपल्या हृदयासाठी त्याचप्रमाणे त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते.
गुळ खाण्याचे फायदे
नैसर्गिकरित्या गोड खाण्यासाठी गुळ हा देखील एक उत्तम पर्याय असतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गुळ हा एक उत्तम पर्याय आहे. गुळामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट आढळतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. आणि हिमोग्लोबिन देखील वाढते.
गुळ आणि मध खाण्याबद्दल आहार तज्ञाची ज्योती सिंग यांनी सांगितलेले आहे की, “वजन कमी करण्यासाठी दूध आणि गूळ हे दोन्ही देखील उत्तम पर्याय आहे दोन्हींमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आहे आणि नैसर्गिक स्वीटनर आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही साखरे ऐवजी गुळ किंवा मध खाऊ शकता. परंतु या दोन्ही गोष्टी देखील एका विशिष्ट प्रमाणातच खायला हव्यात. बऱ्याचदा यामध्ये भेसळ आढळून येते.