जय जवान ! दहशतवादी हल्ला रोखण्यात भारतीय सैन्याला यश,पहा व्हिडीओ

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देश एका बाजूला कोरोनाशी लढत आहे तर दुसरीकडे भारतीय जवान दहशतवादाशी दोन हात करीत आहेत. काश्मीर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला रोखण्याला भारतीय सैन्याला यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात स्फोटके आढळून आली आहेत. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतीय सैन्याला अवंतीपोरा येथील पजगम भागाजवळ एका बागेमध्ये आईडी सापडलं. स्फोटके आढळून येताच भारतीय सैन्यानं बॉम डिस्पोजल स्क्वाडला पाचारण केलं. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यासाठी या ठिकाणी तात्काळ दोन डिस्पोजल स्कॉड दाखल झाले. काही वेळातच या पथकांनी स्फोटकं निकामी केली. याबाबतचे वृत्त या वृत्तसंस्थेने दिले असून याबाबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. दरम्यान दोन आठवड्यांपूर्वी देखीले दक्षिण पुलवामा जिल्ह्यात दहा किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्विटमध्ये जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भारतीय जवानांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.