कोणत्या बॉलरने सर्वाधिक त्रास दिला असता? विराटने घेतले ‘या’ बॉलरचे नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. भारतीय टीम पुढील महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. तेव्हा भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याआधी मुंबईमध्ये कोरोनाचे नियम पाळत आहे. जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. सध्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेले खेळाडू स्वत:चा वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय असतो. शनिवारी त्याने आपल्या चाहत्यांसाठी प्रश्न उत्तराच्या तासाचे आयोजन केले होते. यामध्ये त्याने चाहत्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

या प्रश्न-उत्तरांच्या या सेशनमध्ये एका चाहत्याने विराटला विचारले कि भूतकाळातल्या कोणत्या बॉलरने तुला सर्वाधिक त्रास दिला असता किंवा सर्वाधिक धोकादायक होता? यानंतर विराटने या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमचे नाव घेतले आहे. वसीम अक्रम आणि वकार युनूस या जोडगोळीने जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनना भरपूर त्रास दिला होता.

वसीम अक्रमने आपल्या कारकिर्दीत टेस्ट क्रिकेटमध्ये 414 आणि वनडेमध्ये 502 विकेट घेतल्या होत्या. हे दोन्ही बॉलर आपल्या वेगासह रिव्हर्स स्विंगदेखील उत्तम प्रकारे करत होते. तसेच वासिमने बॉलिंगसोबत टेस्ट क्रिकेटमध्ये 2,898 रन आणि वनडेमध्ये 3,717 रन केले होते. 1996-97 मध्ये अक्रमने झिम्बाब्वेविरुद्ध टेस्टमध्ये 257 रनची खेळी केली होती. पुढील महिन्यात 18 जून ते 22 जून या दरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे हि स्पर्धा जिंकून पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी पटकावण्याचा टीम इंडिया प्रयत्न करणार आहे.

Leave a Comment