हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया कप स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर देशभर आनंदानं व्यक्त केला गेला. त्याच दरम्यान, स्टेडियम वर उपस्थित असलेले अमित शाह त्यांचे सुपुत्र आणि बीसीसीआयचे मुख्य सचिव जय शाह यांच्या एका व्हायरल विडिओ मुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
भारत- पाकिस्तान सामन्यात दरम्यान जय शाह हे भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियम मध्ये उपस्थित होते. यावेळी भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आणि टाळ्याही वाजवल्या. याचवेळी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने जय शहा यांच्या हातात भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा देऊ केला. मात्र, जय शहा यांनी तिरंगा हातात घेण्यास नकार देत टाळ्या वाजवनेच पसंत केले. हि घटना कॅमेरात कैद झाली आणि चाहत्यांनी जय शाह याना चांगलेच ट्रॉल केलं.
Jay Shah seems to have strong influence of his RSS ancestors 👇 pic.twitter.com/FmvF5RVcvI
— YSR (@ysathishreddy) August 28, 2022
जय शाह यांच्या कृत्यांनंतर चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. सोशल मीडियावर एका यूजरने जय शाह यांना प्रश्न विचारला की, त्यांनी तिरंग्याचा असा अपमान का केला? कुणीतरी असंही लिहिलं होतं की जय शाहने आपल्या वडिलांना समजावून सांगावं की खरा भारतीय होण्यासाठी हातात तिरंगा धरण्याची किंवा थिएटरमध्ये राष्ट्रगीत गाण्याची गरज नाही. देशाच्या गृहमंत्र्यांचे सुपुत्र जर हातात तिरंगा घेण्यास नकार देत असतील कर त्यांच्यात देशभक्ती आहे की नाही असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. दरम्यान, जय शाह यांनी अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही