जल जीवन मिशन : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 90 लाख रूपये मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रम सन 2021-22 मधून खालील गावांमधील नळ पाणी पुरवठा कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर कामांमुळे संबंधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना त्याचा लाभ होणार आहे. कराड उत्तर मतदार संघातील गावांना 5 कोटी 90 लाख रूपये मंजूर झाल्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

कराड उत्तर मतदार संघातील खालील गावांना मिळणार निधी 

कोरेगाव तालुक्यातील तारगांव, जायगांव, कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर, हेळगाव, नडशी, कामथी, शामगांव, वाण्याचीवाडी, उत्तर कोपर्डे, वाघेरी, भवानवाडी, वराडे, पाचुंद तर सातारा तालुक्यातील खोडद गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेची पुर्नजोडणी करणे कामांचा समावेश आहे. सदर गावांमध्ये अस्‍तित्‍वातील नळ पाणी पुरवठा योजनांची पुर्नजोडणी होणार असल्‍याने ग्रामस्‍थांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, लोकांची सेवा करण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो. यापुढील काळात मतदार संघातील इतर गावांना आवश्यक निधीची पूर्तता करण्याचा प्रयत्न राहील. सहकार क्षेत्रातील कामासोबत समाजातील सामाजिक कामेही पूर्णत्वास जात आहेत.