जळगाव । लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे जळगाव शहरातील एका परिवाराने जंगी स्वागत केलं आहे. कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह सोहळा परळी वैजनाथ येथील डॉ. कुणाल यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला. लाडकी बहिण लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत माहेरी येणार म्हणून तिचा भाऊ विराज याने हटके स्वागत करायचे ठरवले होते. त्यासाठी तो परळी येथे चक्क हेलिकॉप्टर घेऊन गेला आणि त्याने बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला.
हे हेलिकॉप्टर जळगाव येथील कै. बॅरिस्टर निकम चौक मैदानावर (सागर पार्क) उतरविण्यात आले. शिवानीचे माहेरी झालेले भव्य स्वागत पाहून ती भारावून गेली. तिच्या स्वागतासाठी आप्तेष्ट आणि नातेवाईक हजर होते.
सदर कार्यक्रम सुरुवातीला जळगाव विमानतळावर नियोजित करण्यात आला होता, परंतु विमानतळावरील धावपट्टीवर कारपेंटिंगचे काम सुरु असल्याने विमानतळ प्रशासनाकडून नकार देण्यात आला. यावर मार्ग काढत सर्व शासकीय परवानग्या घेऊन सागर पार्कवर हेलिपॅड तयार करून हेलिकॉप्टर तिथे उतरविण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांजवळ ‘या’ अर्जाची पोचपावती असणे गरजेची; राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/3v4efUK3SF#HelloMaharashtra #ग्रामपंचायतनिवडणूक— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
Breaking News
मोठी बातमी! 'Google'मध्ये तांत्रिक बिघाड; Gmail, Youtube आणि Googleशी निगडीत इतर सेवांवर परिणाम
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/fJmxHLXruL@Google @YouTubeIndia #Google #gmail #YouTube #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 14, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’