जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज सात कोरोना बाधित रूग्ण आढळलेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेे. त्यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिंप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक, भुसावळचे दोन, भडगावचा एक व मूळच्या खामगाव, जि. बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश.
#जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 257 झाली आहे यापैकी 48 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. #StayHomeSaveLives #CoronaUpdatesInIndia @CMOMaharashtra @rajeshtope11 @GulabraojiPatil @avinashdhakne pic.twitter.com/n6zPb8PZ4H
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) May 16, 2020
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 257 झाली आहे, यापैकी 48 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर 33 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णसंखेमुळे आता शहर व जिल्ह्यातील नागरीकांनी आता विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.