जळगावात वाढली रुग्ण संख्या; आज 30 नव्या रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांची संख्या 381

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 78 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसवाळातील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 381 झाली असून आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले तर 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात एकदम 26 नवे कोरोना रुग्ण वाढल्याने  शहरवासीयांची आता चांगलीच चिंता वाढली आहे. याआधी रुग्ण वाढीचा आकडा हा फार कमी होता. मात्र आजच्या रुग्ण वाढीमुळे शहरवासीयांना काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

“कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्याप्रमाणे प्रशासन योग्य ते खबरदारी घेत आहे. त्यामुळे नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे”, असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे .


Leave a Comment