जळगाव जिल्ह्यात नवीन ३२ कोरोना रुग्ण सापडले, एकूण रुग्णांची संख्या १५७ वर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शनिवारी सकाळी आणखी ३२ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या १०३ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापैकी ७१ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील कंटेन्मेंट झोनमधील अंदारपुरा, कसाली, मरीमाता मंदिर, मढी चौक येथे हे ३१ रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्या ३२ रुग्णांमुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १५७ इतकी झाली असून त्यापैकी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like