जळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 172 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा, जळगाव शहरातील आठ, भुसावळच्या चार, सावदा दोन, पारोळा येथील चार रूग्णांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 595 झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत  233 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  तर आतापर्यंत 68 मृत्यू देखील झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने आता जळगाव जिल्हावासी चिंतेत पडले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता अजूनही अनेक ठिकाणी लोकडाउन व सोशल डिस्टनसिंग चे नियम मोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे वेळोवेळी जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासना कडून नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात येत आहे.


Leave a Comment