मतदान केंद्र अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ‘या’ गावात होणार पुन्हा मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी |मतदान केंद्रावर करण्यात येणारी मॉकपोलची मते डिलीट नकेल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघातील १०७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेर मतदान होणार आहे. मॉकपोलची म्हणून टाकण्यात आलेली ५० मते डिलीट करण्यात आली नव्हती तसेच ३ मते देखील अतिरिक्त अढळल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येणर आहे.

या प्रकारात मतदान केंद्र प्रमुखासह अन्य दोन निवडणूक कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे. हि निलंबनाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केली आहे.  मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव बाबूराव पाटील ( सहायक शिक्षक, योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु.ता.अमळनेर) आणि मतदान अधिकारी क्र. 3 सुनीता नारायण देवरे (शिक्षिका, लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव) असे निलंबित करण्यात आलेल्या मतदान केंद्र कर्मचार्यांची  नावे आहेत.

दरम्यान आसा सर्व प्रकार घडल्याने या ठिकाणी २९ एप्रिल  रोजी फेर मतदान घेण्यात येणार आहे. तसेच असा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच  घडल्याचे देखील बोलले जाते आहे.

काय असते ‘मॉकपोल’ मतदान 

निवडणूक अधिकर्यांनी सकाळी ७ वाजण्याच्यापूर्वी मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवारांचे मतदार प्रतिनिधी दाखल झाल्यावर त्यांच्या साक्षीने मॉकपोल मतदानाची चाचणी घेण्यात येते. या चाचणीत किती मते टाकायची आणि कोणत्या उमेदवाराला किती मते टाकायची हे देखील आधीच कागदावर लेखी स्वरुपात नमूद केले जाते. मतदान यंत्रावर हे मॉक पोलचे मतदान करून घेतल्या नंतर संबधित निवडणूक अधिकारी सर्ब मतदार प्रतिनिधीना या मतदान प्रक्रियेचा निकाल दाखवतात. त्यानंतर सर्व मतदान सर्वांच्या समोर डिलीट केले  जाते. त्यानंतर सकाळचे ७ वाजताच मतदानाला सुरुवात करण्यात येते.

Leave a Comment