धक्कादायक ! आईवडिलांचा अपमान जिव्हारी लागल्यामुळे फेसबूक LIVE करत तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यामध्ये एका तरुणाने प्रेम प्रकरणातून आपल्या आईवडिलांचा झालेला अपमान त्याला सहन न झाल्याने त्याने भोकरदन तालुक्याच्या वालसंगी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले व यासाठी कोणालाच जबाबदार ठरवू नये असे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण
सिल्लोड तालुक्यातील सुमीत किशोर पारधे या तरुणाचे प्रेम प्रकरणातून काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादातून त्याच्या आईवडिलांवर माफी मागण्याची वेळ आली होती. आई वडिलांचा झालेला हा अपमान सुमीत याच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि आई वडिलांची इज्जत आपण धुळीत मिळवली या अपराधी भावनेने टोकाचे पाऊल उचलत त्याने आत्महत्या केली.

हा तरुण भोकरदनच्या वालसंगी गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होता. तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकाची दुचाकी रस्त्यात पंक्चर झाली. त्यावेळी ते शिवना गावात दुचाकी दुरुस्त करण्यासाठी थांबले होते. तेव्हा सुमीत हा गोळ्या आणायला जात असल्याचे सांगून तिथून निघाला व वलसांवंगी शिवारात असलेल्या वनीकरण विभागाच्या झुडपात जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याअगोदर त्याने फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडिओ केला होता.

या व्हिडिओमध्ये सुमितने ज्या आई वडिलांच्या डोळ्यात मी आजवर एकदाही पाणी येऊ दिलं नाही, त्यांना माझ्यामुळं खाली पाहावं लागलं. समाजात त्यांचा मोठा अपमान झाला आहे. मी दारु पिऊन खूप चुका केल्या. त्या चुकांसाठी माफी मागतो असेदेखील तो म्हणाला. आई वडिलांचा झालेला अपमान सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असून यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये असे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment