James Anderson 700 Test Wickets : अँडरसनचा भीमपराक्रम!! कसोटीमध्ये 700 बळींचा टप्पा पूर्ण

James Anderson 700 Test Wickets

James Anderson 700 Test Wickets । भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाळा येथील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठा कारनामा केला आहे. कसोटी क्रिकेट मध्ये ७०० बळी घेण्याचा भीमपराक्रम अँडरसनने केला आहे. कुलदीप यादवची विकेट घेऊन अँडरसनने हा माईलस्टोन गाठला आहे. जगातील कोणत्याही जलदगती गोलंदाजाने घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अँडरसनचे वय सध्या ४१ वर्ष असून अजूनही तो तरुणाना लाजवेल अशी गोलंदाजी करतोय.

खरं तर भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच जेम्स अँडरसन हा इतिहास रचेल, अशी अपेक्षा होती. कारण ही मालिका सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसनच्या खात्यात 690 कसोटी विकेट्स होत्या. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत त्याला संधी मिळाली आणि त्याने 5 बळी घेतले होते. यानंतर जेम्स अँडरसनने राजकोट कसोटीत एक विकेट घेतली, येथे त्याला खास अशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतरच्या रांची कसोटीमध्ये त्याने 2 बळी घेतले. आणि आता धर्मशाळा येथील पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात २ बळी घेत अँडरसनने ७०० बळींचा टप्पा (James Anderson 700 Test Wickets) पूर्ण केला.

स्विंग गोलंदाजीची प्रसिद्ध आहे अँडरसन – James Anderson 700 Test Wickets

जेम्स अँडरसनने 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज आहे. आपल्या इन- स्विंग आणि आऊट- स्विंगने अँडरसनने भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल केली आहे. खास करून इंग्लडच्या मैदानावर त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं सर्वात कठीण ठरतं. जेम्स अँडरसनने आत्तापर्यन्त इंग्लंड कडून 187 कसोटी सामने खेळला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यानंतर सार्वधिक कसोटी सामने खेळण्यात अँडरसनच दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक कसोटी विकेट-

1) मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी – 800 विकेट्स
2) शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी – 708 विकेट
3) जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2024): 187* कसोटी – 700* विकेट
4) अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी – 619 विकेट्स
5) स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023): 167 कसोटी – 604 विकेट
6) ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007): 124 कसोटी – 563 विकेट