Jamin Mojani : शेतजमीन मोजणी प्रक्रियेत मोठे बदल; फलक आणि फोटो अनिवार्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांनो, शेतजमिनीचे वाद (Jamin Mojani) आपल्याला काही नवीन नाहीत. शेती म्हंटल की त्याच्या जागेवरून वाद हे आलेच. बांधाला बांध रेटल्याचा आरोप करत अनेकदा सक्खे शेजारी एकमेकांशी वाद घालत असल्याचे आपण पाहिले असेल. परंतु आता शेतजमिनीचे वाद मिटणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने अलीकडेच जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मोजणी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मोजणी प्रक्रिया अतिशय सोप्पी आणि पारदर्शक होणार आहे. जमीन मोजणी प्रक्रियेत नेमका कोणता बदल करण्यात आलाय ते आपण सविस्तर पाहुयात.

भूमी अभिलेख विभागाने शेतजमिनीच्या मोजणी प्रक्रियेत (Jamin Mojani) सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी एकाच सर्वे क्रमांकातील पोटहिश्शांची मोजणी करताना एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, आता शेजारील जमिनीच्या मालकांना नोटीस पाठवण्याचे काम थेट स्पीड पोस्टद्वारे केले जाईल आणि त्या नोटीशीची पोहोच झाल्याशिवाय प्रत्यक्ष मोजणी सुरूच करता येणार नाही. तसेच मोजणी होणाऱ्या जमिनीवर पूर्वसूचना फलक लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या फलकाचा फोटो तारीख व वेळेसह GIS पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे.ज्यामुळे मोजणीचे पुरावे कायम स्वरूपात नोंदवले जातील. भूमी अभिलेख विभागाच्या या नियमामुळे गैरसमज, फसवणूक किंवा जबरदस्ती टाळता येईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल.

हे पण वाचा : फुकटमध्ये मोजा तुमची शेतजमीन, ते सुद्धा फक्त 2 मिनिटांत; ‘ही’ Trick वापरा

यासाठी जो शेतकरी मोजणी साठी अर्ज करणार आहे त्याला शेजारील जमीनमालकांची माहिती अर्जातच द्यावी लागणार आहे. तसेच जागेचा कच्चा नकाशा आणि चतुःसीमेची माहिती अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. संबंधित जागेच्या खरेदीखताची प्रत आणि हक्क संपादनाचा पुरावा देखील द्यावा लागेल, जेणेकरून चुकीची जागा मोजली जाणार नाही. या प्रक्रियेमुळे कोणत्याही शेतकऱ्याच्या मालकी हक्कावर अन्याय होण्याची शक्यता कमी आहे.

फक्त 2 मिनिटात मोजा तुमची शेतजमीन- Jamin Mojani

शेतकऱ्यांनो, तुम्हाला अगदी फुकट मध्ये आणि फक्त २ मिनिटात तुमची शेतजमीन मोजायची असेल तर चिंता करू नका.. हॅलो कृषी या मोबाईल अँप वरून तुम्ही फक्त २ मिनिटात तुमची जमीन मोजू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. तुम्ही आहे त्या जागेवरूनच मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ मोजू शकता. त्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी‘ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link :https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी हे अँप Install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती टाका .

3) त्यानंतर तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा

4) क्लीक करताच आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.

5 ) आता तुमची शेतजमीन नेमकी किती भरतोय हे पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा. ( हेक्तर, एकर चौरस मीटर, चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.

6 ) आता तुम्हांला जी जमीन मोजायची त्याचे एक – एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.

7 ) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.

8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याचा अचूक आकडा तुम्हाला दिसेल.

शेतकरी मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त जमीनच मोजता (Jamin Mojani) येत नाही तर शेतीशी संबंधित अनेक सोयी – सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, रोजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट अर्ज, यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ मिळतोय. तसेच तुम्हाला रोपे खरेदी करता येतील… तुमच्या प्राण्यांची कोणत्याही एजंट शिवाय खरेदी- विक्रीही करता येईल. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्यासाठी आजच हॅलो कृषी हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.