Jammu and Kashmir Bank ने एफडीवरील व्याजदरात केली वाढ, ग्राहकांना 7.25% पर्यंत मिळणार व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jammu and Kashmir Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. आता देशातील सर्वात जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या Jammu and Kashmir Bank ने आपल्या एफडी वरील व्याजदरात वाढ केली आहे.

J&K Bank slips into red with ₹294-crore Q4 net loss - The Hindu BusinessLine

11 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 11 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. Jammu and Kashmir Bank ची स्थापना 1938 च्या सुमारास झाली आणि तेव्हापासून ही बँक खाजगी क्षेत्रातील अनुसूचित व्यावसायिक बँकांपैकी एक बनली आहे.
J&K Bank Comes Under Scanner Amid Allegations of Recruitment Scam

Jammu and Kashmir Bank च्या एफडीचे नवीन दर

आता बँकेकडून 7 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के, 31 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.70 टक्के, 46 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के, 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.50%, 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर आता 6.00%, 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर आता 7.25 टक्के, 2 ते 3 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के, 3 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज मिळेल.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” Jammu and Kashmir Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jkbank.com/deposits/personal/fixedDepositsScheme.php

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या