84 वर्ष जुन्या Jammu and Kashmir Bank ने देखील FD वरील व्याज दरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jammu and Kashmir Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Jammu and Kashmir Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात 75 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे

J&K Bank Comes Under Scanner Amid Allegations of Recruitment Scam

11 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 11 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, या दर वाढीनंतर आता Jammu and Kashmir Bank 1 वर्ष 1 दिवस ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे.

New software installation by J&K Bank creates 'hindrances' for clients

Jammu and Kashmir Bank चे नवीन एफडी दर

आता बँकेकडून ग्राहकांना 7 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के आणि 31 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.70 टक्के व्याज मिळेल. त्याच प्रमाणे 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50%, 91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 4.75%, 181 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 5.50%, 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75%, 1 वर्ष कालावधीच्या FD वर 6.75 टक्के, 1 वर्ष 1 दिवस ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.25 टक्के व्याज मिळेल. याशिवाय 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देशांतर्गत FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळत राहील.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jkbank.com/others/common/intrates.php

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये