श्रीनगरपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अद्याप अधिकृत तारीख निश्चित झालेली नसली, तरी कटरा ते श्रीनगर वंदे भारतसह दोन मेल एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक, थांबे आणि भाडे किती असेल.
वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
सप्ताहात ६ दिवस धावणारी वंदे भारत एक्सप्रेस
कटरा → श्रीनगर : सकाळी ८:१० वाजता सुटणार आणि ११:२० वाजता श्रीनगरला पोहोचणार.
श्रीनगर → कटरा : सकाळी ८:५५ वाजता सुटणार आणि दुपारी १२:०५ वाजता कटराला पोहोचणार.
रोज धावणाऱ्या दोन मेल एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक
पहिली मेल एक्सप्रेस
कटरा → श्रीनगर : सकाळी ९:५० वाजता** सुटणार आणि दुपारी १:१० वाजता** श्रीनगरला पोहोचणार.
श्रीनगर → कटरा : सकाळी ८:४५ वाजता** सुटणार आणि दुपारी १२:०५ वाजता** कटराला पोहोचणार.
दुसरी मेल एक्सप्रेस
कटरा → श्रीनगर : दुपारी ३:०० वाजता सुटणार आणि संध्याकाळी ६:२० वाजता श्रीनगरला पोहोचणार.
श्रीनगर → कटरा : दुपारी ३:१० वाजता सुटणार आणि संध्याकाळी ६:३० वाजता कटराला पोहोचणार.
किती असेल भाडं?
श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि तीशून्य डिग्री तापमानातही सुरळीत धावू शकणारआहे.कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट ₹१५०० ते ₹२५०० दरम्यान असू शकते.एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी भाडे ₹२२०० ते ₹२५०० असू शकते.अधिकृत घोषणा झाल्यानंतर भाड्यात काही बदल होण्याची शक्यता आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या प्रमुख स्थानकांवर थांबेल –
दिल्ली
अंबाला छावनी
लुधियाना जंक्शन
पठाणकोट छावनी
जम्मू तवी
श्री माता वैष्णो देवी (कटरा)
रियासी
बनिहाल
कांजीगुंड
अनंतनाग
श्रीनगर
कधी सुरू होईल वंदे भारत एक्सप्रेस सेवा?
अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु रेल्वे तज्ज्ञांच्या मते ही ट्रेन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते.एप्रिलमध्ये काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढते, त्यामुळे या ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्रीफारूक अब्दुल्ला यांनीही ट्रेन सेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ट्रेनच्या तपासणीसंबंधी सर्व कामे पूर्ण झाली असून अंतिम अहवाल मिळताच सेवा सुरू केली जाईल.
काश्मीरसाठी नवीन पर्व
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर कटरा ते श्रीनगर प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांसाठी ही एक सुवर्णसंधी असेल. आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. आपल्या पुढील काश्मीर प्रवासासाठी तयार राहा!