सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जावली तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. आमदार शशिकांत शिंदे याच्या उपस्थितीत तब्बल 13 वर्षांनी जावली पंचायत समितीमध्ये आज दुपारी 1 वाजता जनता दरबार भरवण्यात आला आहे, अशी माहिती जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावतीने देण्यात आली.
आ. शशिकांतजी शिंदे हे जावलीचे आमदार होते तेव्हा महिन्यातून एकदा जावली पंचायत समितीमध्ये जनता दरबार भरविला जात होता. त्यातून तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेत विकास कामाबाबत चर्चा केली जाईची. मात्र, आ. शिंदे यांचे कोरेगाव तालुक्यात राजकीय पुनर्वसन झाल्यामुळे यात खंड पडला होता.
मात्र, आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी जावलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. विकास कामासाठीही ते पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे तब्बल 13 वर्षांनंतर जावलीत दुपारी 1 वाजता जनता दरबार घेण्यात आला आहे. यावेळी जावली तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विकास कामांरोबर ग्रामस्थांच्या समस्या, शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे हे आज जावली तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार ,जि .प . माजी शिक्षण सभापती अमित कदम , तसेच जावलीच्या सभापती जयश्रीताई गिरी व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.