कराडनंतर आता जावळी तालुकाही कंटेनमेंट झोनमध्ये, ‘हि’ २८ गावे पूर्णपणे सील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जावली (मेढा) यांनी जावली तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने जावली तालुक्यातील 28 क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र करण्याबाबत प्रस्तावित केले आहे.

या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जावली तालुक्यातील मौजे धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कुसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हातेखुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी त मेढा, सावली ही गावे व मेढा नगरपंचायत क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जावली तालुक्याती वर नमूद केलेल्या क्षेत्रामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार पुढीलप्रमाणे 26 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

याप्रमाणे सातारा जिल्हयातील जावली तालुक्यातील मौजे धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कुसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हातेखुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी त मेढा, सावली ही गावे व मेढा नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, उद्योग इ. चालू ठेवणेस सक्त मनाई करण्यात आली आहे . अत्यावश्यक सेवेतील फक्त औषधे, घरगुती गॅस सिलेंडर व दूध घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर सातारा ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे औषधे, घरगुती गॅस सिलेंडर व दुध घरपोच पुरविण्यात येतील.

या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी कर्मचारी वगळणेत येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करणेकामी नियुक्त करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना चूकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चूकीची माहिती देणा-या विरुध्द कठोर कारवाई करणेची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी. व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.

यापुर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रदद करण्यात आले आहेत. यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच उपविभागीय दंडाधिकारी सातारा तथा इन्सीडंट कमांडंर सातारा यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणाऱ्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक,दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र यांचे वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करावा. पोलीस विभागाने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Leave a Comment