हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मण हाके की मनोज जरांगे पाटील? ताकद नेमकी कुणाची जास्त आहे? मराठा की ओबीसी? वर्ष वर्षभर पत्रकारांचे कॅमेरे जिकडे फिरकतही नाहीत त्या जालन्यातील अंतरवाली सराटी आता राजकारणाचा आणि सामाजिक जातीय अस्मितांचा सेंटर पॉइंट ठरलाय… याच ठिकाणी जरांगे पाटलांनी पेटवलेल्या आगीची झळ राजकारण्यांपासून ते सरकारलाही बसली…लोकसभेच्या निवडणुकीतही हाच जरांगे इफेक्ट निर्णायक ठरला…त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रेशर पॉलिटिक्सचा वापर करून सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश लवकरात लवकर लागू करावा, यासाठी जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आमरण उपोषण एका महिन्याच्या अल्टिमेटमवर थांबवण्यात आलय… पण दुसरीकडे याच अंतरवाली सराटीच्या वेशीवर लढवय्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही…असं सरकारकडून लेखी लिहून मिळत नाही.. तोपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केलीय… एवढंच नाही तर त्यांनी जरांगे पाटलांना शिंगावर घेण्याचं काम केलय…
लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेतच पण सोबतच त्यांच्या संविधानाच्या समजेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत…. अंतरवाली सराटीच्या वेशीवर जरांगे वर्सेस लक्ष्मण हाके यांच्यात वादाची ठिणगी कशी पडलीय? दोघांनीही सरकारवर प्रेशर आणायला सुरुवात केल्यामुळे सरकार आता नेमकं कुणाचं एकणार? जरांगेंच्या प्रयत्नांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार की हाकेंच्या उपोषणामुळे ओबीसी आरक्षण जैसे थे राहणार? तेच पाहूयात,… हाके की जरांगे पाटील यांच्यापैकी ताकद नेमकी कुणाची जास्तय? ते बघायचं असेल तर आपल्याला आधी त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज घ्यावा लागतोयेणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो, जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सग्या सोयऱ्याचा आदेश काढेल त्यांचे आमदार आम्ही चून चून के गिरायेंगे…लक्ष्मण हाके यांचे उपोषणाला भेट द्यायला आलेल्या प्रकाश शेडगे यांनी दिलेला हा इशारा…आता शेडगेंनी नेम दुसरीकडे धरला असला तरी त्यांचा निशाणा कुठे होता? हे वेगळं सांगायची गरज नाही… लोकसभेला नाव घेतलं नाही…पण विधानसभेला आमदारांना नाव घेऊन पाडेन… असा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेलं हे प्रत्युत्तर…
मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेची कायद्यात रूपांतर करा, अशी मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती… त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं… जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण विधानसभेला निवडणुका लढवू…आमदारांची नावं घेऊन सांगून पाडू…असा अल्टिमेटम जरांगेंनी दिला होता… एकट्या मनोज जरांगे फॅक्टरने लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या विरोधात घालवला…त्यामुळेच सरकारने जरांगेंना सिरीयसली घेत आपलं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी पाठवलं. राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे स्वत: या शिष्ठमंडळात होते….तसेच भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचादेखील या शिष्टमंडळात समावेश होता…थोडक्यात मनोज जरांगेंसाठी हायप्रोफाईल नेते मंडळींना अंतरवाली सराटीत यावं लागलं…राज्य सरकारला सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम देत मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आणि ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेले…
पण हे सगळं होताना अंतरवाली सराटीच्या वेशीवरच लक्ष्मण हाके यांनी ओबीसी एल्गार करून आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढलय…ओबीसी आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही, असं लेखी जोपर्यंत सरकार देत नाही…तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, अशी कोंडी हाकेंनी सरकारची आणि अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंची देखील केली आहे…एवढंच नाही तर हाकेंनी जरांगे पाटलांच्या ताकदीलाही हलक्यात घेतलय…जरांगे हे स्टंटबाज, राजकीय मोटिवेटेड नेते आहेत… ते कुणी सोशल रिफॉर्मर नाहीत…त्यांना कायद्याचं शून्य टक्के नॉलेज आहे…अशा शब्दात त्यांनी जरांगे पाटलांना शिंगावर घेतलय…त्यामुळे लोकसभेनंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाच्या आगीचा भडका चांगलाच वाढणारय, हे स्पष्ट आहे…
जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीच्या पहिल्या दिवसापासूनच लक्ष्मण हाके त्यांना विरोध करू लागलेत…मराठा समाजाच्या भावना तीव्र असतानाही हाके यांनी हा विरोध सुरूच ठेवला होता… आता मात्र आमदारकीच्या तोंडावरच त्यांनी थेट सरकारला अल्टीमेटम दिल्यामुळे मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत…पण सरकारने हाकेंच्या, ओबिसींच्या उपोषणाकडे फारसं सिरीयसली पाहीलेलं नाहीये.. मीडियामधूनही हाकेंच्या या उपोषणाला अगदीच कमी फुटेज दिलं जातंय…त्यामुळे आता नेमकं जिंकणार कोण? हे ठरवायचंय ते सरकारला… सग्या सोयऱ्याबाबत जी अधिसूचना काढली आहे ती सरकारने मागे घ्यावी आणि कुणब्यांचे देत असलेले दाखले सरकारने थांबवावे… अशी लक्ष्मण हाकेंची मागणी… तर लवकरात लवकर सग्या सोयऱ्याबाबतचा जीआर लागू करावा, ही जरांगे पाटलांची मागणी…त्यामुळे सरकार कुणाच्या मागण्या मान्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे… या निर्णयावर सरकार राजकारणात मराठ्यांना की ओबीसींना सिरियसली घेतं याचा जणू निकालच लागणार आहे…
महादेव जानकर यांची रासप, शिवसेना अशा पक्षात राजकीय उभारी घेणारे आणि ओबीसींचे नेते समजले जाणारे लक्ष्मण हाके सग्यासोयऱ्यांचा जीआर रद्द करूनच थांबतात… की मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर विधानसभेला महाराष्ट्राला दाखवून देणार…हा येणारा काळच सांगेल…बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात ताकद कुणाची जास्तय? मनोज जरांगे पाटील की लक्ष्मण हाके? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा