रिअल लाईफ सुपरहिरो पॉईंटमन मयूर शेळकेला JAVA बाईक मिळणार गिफ्ट, आंनद महिंद्रांनीही केले कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय थरारक पद्धतीने रेल्वे रुळावर पडलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवणाऱ्या पॉईंट मन मयूर शेळके (28) याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मन हेलावून टाकणाऱ्या त्याच्या व्हिडिओ नंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील मयूरला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जावा मोटर सायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवीकोरी जावा मोटर बाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरून जाहीर केले आहे.

जावा कंपनीचे अनुपम थरेजा यांनी म्हटले आहे की,’ पॉईंट मयूर शेळके यांच्या धैर्यानं जावा मोटरसायकल कुटुंबीय थक्क झाले आहे. त्याच्या शौर्याच्या कृतीबद्दल जावा हिरोच्या पुढाकाराचा भाग म्हणून जावा मोटर सायकल देऊन त्याचा आम्ही गौरव करू इच्छितो’.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,’ मयूर शेळके कडे पोशाख किंवा कॅप नव्हती परंतु त्यानं चित्रपटातल्या धाडसी हिरो पेक्षा अधिक धैर्य दाखवले आहे. आम्ही सर्वजण त्याला सॅल्यूट करायला जावा परिवारासोबत आहोत. मयूर ने आम्हाला दर्शवले आहे की आम्हाला फक्त दररोजच्या लोकांकडे पाहावा लागेल जे आम्हाला चांगल्या जगाकडे जाण्याचा मार्ग दर्शवतात’ असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

काय होती घटना

मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वरून जाणाऱ्या लहान मुलाचा तोल गेला आणि हा मुलगा रुळावर पडला. समोरून भरधाव वेगानं रेल्वे घेत होती. या मुला समोर असणारी महिला ही अंध होती त्यामुळे ती काहीच करु शकत नव्हती. अशावेळी प्रसंगावधान राखून पॉईंटमन मयूर शेळके यांनी या लहान मुलाला वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. प्रसंगावधान राखून मयूर शेळके यांनी या चिमुकल्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून मयूर शेळके यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment