मुंबई । प्रिसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना (Richard Dawkins Award) रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी जावेद अख्तर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.विशेष म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि धर्मनिरपेक्षतेवर तर्कनिष्ठ विचार मांडणाऱ्या डॉकिन्स यांच्या नावं दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारानं सन्मानित केलं गेल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मानवी बौद्धीक विकासाला प्रोत्साहन देणं, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी कार्य करणं आणि विचारक्षमता यासाठी जावेद अख्तर यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.’माझे विचार इतक्या दुरवर पोहोत आहेत याचं मला आश्चर्य वाटतं. धर्मनिरपेक्ष आणि माझ्या विचारांशी जगातील अनेक जण सहमत आहेत ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे’, अशी प्रतिक्रिया जावेद अक्खर यांनी पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर दिली.यापूर्वी अमेरिकीचे कॉमेडियन बिल माहेर आणि तत्त्ववेत्ते ख्रिस्तोफर हिचेन्स यांना या पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.
देशातील राजकीय, सामाजिक अनेक मुद्द्यांवर जावेद अख्तर त्यांचं मत रोखठोक मांडतात. हे मत मांडत असताना थेट मुद्द्यावर ते हात घाततात. विषायाला धरून ते त्यांचं मत मांडत असतात. सध्या देशात सुरू असलेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांचं मत अत्यंत परखड पणे व्यक्त केलं. धार्मिक रूढी-परंपरा, धर्म चिकित्सा, राजकीय, सामाजिक तसेच सीएए, तबलिगी जमात यासारख्या विषयांवर त्यांनी त्यांची मतं जाहीरपणे तसेच ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”