टीम, HELLO महाराष्ट्र । ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये लौंचिंग पासूनच धुमाकूळ घालणाऱ्या जावा मोटर्स ने आपली आणखी एक दमदार बाईक लाँच केली आहे. जावा पेराक (Jawa Perak) असे या बाईक चे नाव असून तब्बल १. ९५ लाख रुपये इतकी तिची किंमत आहे. ही बाइक कंपनीने एक वर्षापूर्वीच सादर केली होती. त्यावेळी या बाईकची किंमत १.८९ लाख रुपये होती, पण आता लागू होत असलेल्या बीएस-६ मानकांनुसार बाईकच्या किंमतीत ६००० रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकीच्या क्लासिक लीजंड्स कंपनीने आपली नवी बाईक लाँच केली आहे. जावा पेराकची बुकिंग १ जानेवारी २०२० पासून सुरू होतेय, तर २ एप्रिल २०२० पासून या बाइकची डिलिव्हरी सुरू होणार आहे. जावा पेराकमध्ये ३३४ सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ३० बीएचपीची ऊर्जा आणि ३१ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.
६ स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देखील यात आहे. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक Classic आणि Forty Two ला मागे सोडते. तसेच या बाइकच्या पुढील बाजूला १८ इंचाचे स्पोक व्हिल आहेत, तर मागील बाजूला १७ इंच व्हिल आहे. बाइकमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टिम आहे. बाइकच्या हेडलाइटवर डिजिटल मीटर आहे.