‘या’ कारणामुळे लग्नाच्या वाढदिवशी जयंत पाटीलांना बायकोने दिली गाई भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या पत्नीकडून लग्नाच्या वाढदिवशी चक्क गाय भेट म्हणुन मिळालीय. लग्नाच्या वाढदिवशी गाय का बरं दिली असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबाबत पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून सर्व प्रकार सांगितलाय.

‘महाराष्ट्रात दुष्काळात जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत. अशीच एक गाय माझ्या पत्नीला औंधच्या यमाईच्या दर्शनावरून परत येताना अन्नपाण्यावाचून तडफडताना दिसली. तिने त्वरित त्या गाईला जीपमध्ये घालून घरी आणले. या गाईवर योग्य ते उपचार चालू आहेत. हळूहळू ती सुदृढ होईल’ असं पाटील यांनी म्हटलंय.

‘आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, त्या निमित्ताने शैलजाने मला दिलेली हि सुखद भेटच आहे. आम्ही कुटुंबीयांनी आता या गाईला दत्तक घेतले असून ती आमच्या कुटुंबाचा एक भागच झाली आहे’ असे म्हणत पाटील यांनी फेसबुक पोस्ट केलीय.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

Leave a Comment