Wednesday, March 29, 2023

जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची बुधवारी प्रकृतीअचानक बिघडली . त्यांना तत्काळ उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मंत्री पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वातू लागल्याने त्यांच्या सहकार्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, सतेज पाटील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार सध्या मंत्री पाटील यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री जयंत पाटील हे देखील होते. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केलेली आहे. यानंतर, मंत्री पाटील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते.