नोव्हेंबरनंतर जयंत पाटील पदाचा राजीनामा देणार?? त्या सूचक वक्तव्याने वेधले सर्वांचे लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरी करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी “मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष राहील नोव्हेंबर नंतर पदावर नसणार” असे स्पष्टपणे सांगून दिले. त्याचबरोबर “माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका, काही तक्रार असल्यास शरद पवार यांना सांगा” असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले.

जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा अहमदनगर मध्ये मोठ्या थाटात वर्धापन दिन सोहळा साजरी करण्यात आला. या सोहळ्यामध्ये जयंत पाटील यांच्याकडून अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोमणे मारण्यात आले. याचवेळी बोलताना त्यांनी, मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असे देखील सांगितले. त्यामुळे जयंत पाटील यांनी पद सोडल्यानंतर या पदाची धुरा कोणाकडे दिली जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वर्धापन सोहळ्यात जयंत पाटील यांनी अजित पवारांनाही टोला लगावला. यावेळी बोलताना, “पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नसते, कारण आमच्या शाळेचे हेडमास्तर पवारसाहेब आहेत. त्याकाळी ही माझ्या सारख्या अनेक नवीन कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. आज पुन्हा एकदा त्याच मोडमध्ये पवारसाहेब आहेत. भाजपा सारखे 400 पार म्हणायची चूक मी करणार नाही. पण विधानसभेत प्रत्येक सीट निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे” असे जयंत पाटील यांनी म्हणले.