जयवंतराव भोसले पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध : अध्यक्षपदी दत्तात्रय पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दत्तात्रय पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच धनाजी जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था सातारा जिल्ह्यात सहकारी व आर्थिक क्षेत्रातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखली जाते. या पतसंस्थेच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली.

या प्रक्रियेत सर्वसाधारण गटातून – दत्तात्रय रघुनाथ पाटील (वाठार), धनाजी भानुदास जाधव (सैदापूर), भास्कर बापूराव साळुंखे (रेठरे बुद्रुक), हणमंत आत्माराम थोरात (सवादे), शिवाजी शंकर कणसे (जखिणवाडी), दादासो खाशाबा शेवाळे (मनव), सिद्धेश्वर हरिश्चंद्र पाटील (वारुंजी), मंगेश बबन गरुड (येणके), महिला राखीव गटातून- रुपाली बाजीराव माने (मालखेड), सुनिता भगवानराव पाटील (मलकापूर), अनुसूचित जाती-जमाती गटातून अमित उत्तम माने (घारेवाडी), इतर मागासवर्गीय गटातून – वसीम शब्बीर मुल्ला (मलकापूर), विमुक्त जाती – भटक्या जमाती – विशेष मागासप्रवर्गातून दिपक तुकाराम गावडे (मलकापूर) यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

या निवडीबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक मंडळाने कृष्णा हॉस्पिटल येथे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

Leave a Comment