भाजपला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी  | माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणून समोर आला तो म्हणजे याच मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा. त्यांच्या या पाठींब्यानंतर कॉंग्रेसच्या पक्ष शिस्तीचा पुरा बोजवाराच वाजला. त्याच जयकुमार गोरेंनी लोकसभा निवडणुकी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

स्थानिक विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून आपण भाजपला पाठिंबा दिला होता. माझी आशा आहे कि भाजपचे नेते माझ्या मतदारसंघातील विकासाचे मुद्दे तडीस लावतील असे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हणले आहे.

जयकुमार गोरे यांनी नजीकच्या काळात गिरीष महाजन यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीनंतर गोरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे. त्यावर देखील त्यांनी आपले मत व्यक्त केला आहे. आपण आपल्या मतदारसंघातील पाणी प्रश्ना संदर्भात महाजनांना भेटायला गेले होतो. आपण कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. मी कधीही भाजपमध्ये जाणारा नाही असे गोरे म्हणाले आहेत.

Leave a Comment