‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी घेतला आहे. अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना या काळात गमावले आहे. या लाटेचा जबरदस्त धक्का अभिनय सृष्टीलाही लागला आहे. ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत जोशींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसमवेत मालिकेतील सहकलाकार व इतरत्र टीम मेम्बर्सनेही शोक व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/CPGEU0XJ-2s/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेते हेमंत जोशी याना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्यांच्यावर उपचारही सुरु होते . मात्र अखेर १९ मे २०२१ रोजी हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेत ‘भावे’ नामक भूमिका साकारली होती. ह्या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहतील. हेमंत जोशी अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाचा त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री सुमेधा दातार आणि अभिनेता सुप्रीत निकम यांनी हेमंत जोशींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

https://www.facebook.com/supreetnikam/posts/5545675365503840

‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेत ‘विजया काकी’ हि भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इंस्टाग्रामवर हेमंत जोशींचा फोटो शेअर करीत त्यांना एक भावुक पोस्ट लिहिली आहे. ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहायला मनच धजत नाहीये. दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटी़ सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व. कसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच ‘ऐश’… माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास…आणि काल अचानक भावे गेले … किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत ‘ऐश’ करा…,’ अशी भावनिक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.

अभिनेता सुप्रीत निकम यानेही हेमंत जोशींच्या निधनावर भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, ‘आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र गमावला आहे. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रानपेक्षा कमी नव्हता. काका, तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही, आता कुणाला फोन करू’. अभिनेते हेमंत जोशी यांनी मालिका, चित्रपटांसह अनेक नाटकांमध्येदेखील अव्वल दर्जाचे काम केले होते. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘टेंडल्या’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक मराठी चित्रपटांत ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले होते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते.

Leave a Comment