हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| LIC आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन पॉलिसी आणत असते. या पॉलिसीचा फायदा ही ग्राहकांना होताना दिसतो. एलआयसीच्या पॉलिसी या सर्व वयोगटातील लोकांसाठीच उपलब्ध असतात. त्यामुळेच LIC त गुंतवणूक करणे अनेकांना परवडते. सध्या अशीच एक LIC ची पॉलिसी जास्त परतावा ऑफर करत आहे. या पॉलिसीचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी. आज आपण याच पॉलिसीची माहिती जाणून घेणार आहोत.
एलआयसीची जीवन विमा पॉलिसी हे अत्यंत सुरक्षित आणि बचत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी रक्कम मिळते. ही एक एंडॉवमेंट पॉलिसी आहे. त्यामुळेच तीला नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, बचत योजना पॉलिसी म्हणले जाते. या पॉलिसीत गुंतवणूक केल्यानंतर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा रकमेच्या किमान 105 टक्के रक्कम दिली जाते. या पॉलिसीत तुम्ही 16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षे अशा वयोगटात गुंतवणूक करू शकता.
तब्बल 54 लाख रुपये मिळतील
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 59 वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी या पॉलिसीत गुंतवणूक केली तर दरमहा तुम्हाला 7,572 रुपये वा दररोज 252 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच तुम्ही दरवर्षी 90,867 रुपये जमा करताल. अशाप्रकारे एखाद्या पॉलिसीधारकाने गुंतवणूक केल्यास त्याला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर 54 लाख रुपये मिळतील. यासह प्रत्यावर्ती बोनस आणि मॅच्युरिटीचा अंतिम बोनस देखील मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही एखाद्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही पॉलिसी सर्वात उत्तम आहे.