टीम हॅलो महाराष्ट्र । ई-कॉमर्स कंपनी Amazone लवकरच इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा घेऊन भारतात येत आहे. Amazonचे संस्थापक जेफ बेझोस यांनी सोमवारी याबद्दल एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी झिरो कार्बन उत्सर्जनासह ई-रिक्षा भारतात आणणार असल्याचे म्हटले आहे. Amazon ही कंपनी सात वर्षांपूर्वी भारतात आली. येथे कंपनीने 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसे गुंतविले आहेत.
आपल्या ट्विटमध्ये जेफ बेझोस म्हणाले, ‘हे, इंडिया! आम्ही इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षाच्या स्वरूपात नवीन उत्पादन घेऊन येत आहोत. हे पूर्णपणे विद्युत आहे आणि शून्य कार्बन उत्सर्जित करते. ‘ आपल्या ट्विटमध्ये बाजोस यांनी ‘क्लायमेट प्लेज’ हा हॅश टॅगही लावला आहे. बेझोसने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, बेझोस आपल्या बर्याच सहकाऱ्यांसह इलेक्ट्रिक डिलीव्हरी रिक्षा चालवताना दिसत आहे.
बेझोसने ई-रिक्षा चालवण्याचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी शेअर केला आहे. बेजोसने गेल्या आठवड्यात आपला भारत दौरा पूर्ण केला. ट्विटरवर आपल्या भेटीदरम्यान त्याने बरेच फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. रविवारी बेझोसने एक व्हिडिओही शेअर केला ज्यामध्ये तो कंपनीच्या डिलिव्हरी स्टेशनवर कर्मचार्यांशी संवाद साधत आहे.
बेझोस यांनी भारतीय ग्राहकांना एक खुले पत्रही लिहिले आहे. या खुल्या पत्रात बाजोस यांनी लिहिले की भारतीय लोकांची अपार उर्जा आणि संयम त्यांना प्रेरणा देतात.
Hey, India. We’re rolling out our new fleet of electric delivery rickshaws. Fully electric. Zero carbon. #ClimatePledge pic.twitter.com/qFXdZOsY4y
— Jeff Bezos (@JeffBezos) January 20, 2020
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”