Wednesday, October 5, 2022

Buy now

जेनिफर लोपेझ-बेन अ‍ॅफ्लेक यांनी 20 वर्षांनंतर पुन्हा केली एंगेजमेंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड गायिका जेनिफर लोपेझ आणि अभिनेता बेन ऍफ्लेक यांनी पुन्हा एकदा रेलशनशिप मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. 20 वर्षांनंतर दोघांनी पुन्हा एकदा एंगेजमेंट केली. अ‍ॅलेक्स रॉड्रिग्जसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जेनिफर लोपेझची बेन ऍफ्लेकसोबत जवळीक वाढली आणि दोघांमध्ये रोमान्स सुरू झाला.

जेनिफर लोपेझच्या प्रतिनिधीने देखील बेन ऍफ्लेकशी झालेल्या तिच्या एंगेजमेंटची पुष्टी केली आहे. यापूर्वी, या जोडप्याने लग्न केल्याची अफवा देखील पसरली होती. या अफवांवर शिक्कामोर्तब करत सिंगरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून एंगेजमेंटच्या वृत्तालाही दुजोरा दिला आहे.

खुद्द लोपेझने दिली गुड न्यूज
लोपेझने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये म्युझिक वाजताना ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये लोपेझच्या आवाजात ‘यू आर परफेक्ट’ हे ऐकू येत आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले की,” हे जाहीर करताना मी उत्साहित झाले आहे.” मात्र, या दोघांची एंगेजमेंट कधी झाली याबाबतचा खुलासा अद्यापही झालेला नाही. गेल्या काही दिवसांत पार्ट्या, इव्हेंट्स, रेड कार्पेट्स व्यतिरिक्त हे हॉलिवूड स्टार्स एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवतानाही दिसून आले आहेत.

20 वर्षांपूर्वी चाहत्यांनी दिले होते ‘बेनिफर’ असे नाव
20 वर्षांपूर्वीही हे जोडपे एकत्र होते. दोघांनाही त्यांच्या चाहत्यांनी ‘बेनिफर’ हे नाव दिले होते. दोघांनी 2002 मध्ये एंगेजमेंटही केली होती, मात्र एंगेजमेंट नंतर त्यांच्या नात्यात अंतर येऊ लागले आणि दोघांनी एंगेजमेंट तोडली.

लोपेझने आतापर्यन्त केले आहेत तीन विवाह
लोपेझने 1997 मध्ये अभिनेता ओजानी नोआशी पहिले लग्न केले आणि 1998 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर, लोपेझने 2001 मध्ये अमेरिकन अभिनेता आणि कोरिओग्राफर ख्रिस जडची जीवनसाथी म्हणून निवड केली. हे लग्न फक्त दोनच वर्षे टिकले. त्यानंतर 2004 मध्ये जेनिफरने अमेरिकन गायक मार्क अँथनीसोबत लग्न केले. मार्क आणि लोपेझचे लग्न 10 वर्षे टिकले आणि 2014 मध्ये दोघे वेगळे झाले. यावेळी आता हे दोघेही कधी लग्न करणार याचा अंदाज त्यांचे चाहते बांधत आहेत.