नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा (Jeremy lalrinnunga) याने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 19 वर्षीय वेटलिफ्टरने (Jeremy lalrinnunga) पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने या स्पर्धेत (Jeremy lalrinnunga) 300 किलो वजन उचलून हि कामगिरी केली आहे. जेरेमीने (Jeremy lalrinnunga) 2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाशिवाय त्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. आता त्याच्याकडून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
भारताच्या खात्यात 2 गोल्ड जेरेमीने (Jeremy lalrinnunga) 300 किलो वजन उचलून गेम्स मध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे. सिल्वर सामोआच्या नेवोने 293 किलो वजन उचललं. त्याची नजर गोल्डवर होती. क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने 174 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य झालं नाही. जेरेमीच्या या गोल्डसह कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने एकूण 2 गोल्ड, 2 सिल्वर आणि एका ब्राँझसह एकूम 5 पदकं जिंकली आहेत. विशेष म्हणजे भारताने ही सर्व पदकं वेटलिफ्टिंग मध्ये मिळवली आहेत.
या स्पर्धेमध्ये जेरेमी लालरिनुंगा (Jeremy lalrinnunga) (सुवर्ण पदक), संकेत महादेव सरगर (रौप्य पदक), गुरुराजा पुजारी (कांस्य पदक), मीराबाई चानू (सुवर्ण पदक), बिंदियारानी देवी ( रौप्य पदक) यांनी पदकांची कमाई केली आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 130 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?