हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नाशिकमधील एका खाजगी होम फायनान्स कंपनीमधून (Home Finance Company) तब्बल 4 कोटी 92 लाख रूपये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कंपनीने आपल्या जुना गंगापुर नाका शाखेत 222 ग्राहकांचे दागिने ठेवले होते. परंतु काही अज्ञात व्यक्तींनी हे दागिने लंपास केले आहेत. या दागिन्यांमध्ये दीड किलो सोनेहीअसल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार कंपनीमधील सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे. ज्यात स्पष्ट दिसत आहे की, चोरांनी हुशारीने एखाद्या पिक्चरमध्ये दाखवतात तशा पद्धतीने या दागिन्यांची चोरी केली आहे.
नेमके काय घडले??
मिळालेल्या माहितीनुसार, जुना गंगापूर नाका येथील इंदिरा हाइट्स कॉर्परेट संकुलामध्ये होम फायनान्स कंपनीची शाखा आहे. या कंपनीने आपल्या सेल्फी लॉकरमध्ये तब्बल 222 ग्राहकांचे दागिने ठेवले होते. मात्र, 4 मे रोजी ब्लॉकरमधील दागिने गायब झाल्याचे उघडकीस आले. कारण की, याचं दिवशी आपल्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी एक ग्राहक आला होता. या ग्राहकाचे लॉकर ज्यावेळी दागिने ठेवण्यासाठी उघडण्यात आले त्यावेळी लॉकरमध्ये जुने दागिने नव्हते. यानंतर इतर ग्राहकांचेही लवकर तपासण्यात आले तर त्यामध्येही दागिने उपलब्ध होते. पुढे हा सर्व प्रकार मॅनेजरने आपल्या वरिष्ठांना सांगितला. त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.
Money Heist वेबसिरीजप्रमाणे चोरी
घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे की, चोर कंपनीच्या खिडकीमधून आत आले असावेत. त्यांनी लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि दागिने घेऊन ते पळून गेले. महत्वाचे म्हणजे, त्यांनी ही चोरी फक्त पंधरा मिनिटांमध्ये केली. बँकेतील कर्मचाऱ्यांनी लॉकरच्या चाव्याही लॉकरच्या आजूबाजूलाच ठेवल्या होत्या. त्यामुळे त्या चोरांना सहज सापडल्या. यामुळे त्यांना अवघ्या काही मिनिटांत चोरी करणे शक्य झाले. सध्या या चोरी प्रकरणामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. तसेच ही चोरी मनी हाइस्ट वेबसिरीजप्रमाणे करण्यात आली असल्याचेही म्हणले जात आहे.