हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रीपेड प्लॅन्ससह (Prepaid Plans) अनेक आकर्षक ऑफर देत आहे. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंग आणि OTT सेवा मोफत दिल्या जात आहेत. जिओच्या अशाच काही प्रीमियम प्लान्समध्ये १२ ओटीटी अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक याकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. हे प्लॅन्स कोणते आहेत आपण जाणून घेऊया..
१७५ रुपयांचा प्लान
जिओच्या १७५ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता असून १० जीबी डेटा दिला जातो. हा डेटा Only Plan मध्ये असल्याने ग्राहकांना अतिरिक्त डेटा वापरण्यासाठी उपयुक्त ठरतो. या प्लानसोबत १२ ओटीटी सेवांचा मोफत अॅक्सेस दिला जातो. यात सोनीलिव्ह, झी 5, जिओ सिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन एनएक्सटी, कांछा लांका, प्लॅनेट मराठी आणि जिओ टीव्हीचा समावेश आहे.
४४८ रुपयांचा प्लान
ग्राहकांना डेली डेटा, कॉलिंग, SMS आणि OTT सेवांचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी ४४८ रुपयांचा प्लान उत्तम पर्याय आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि २८ दिवसांसाठी १२ ओटीटी अॅप्सचा कंटेंट फ्री मिळतो. यामध्ये फॅनकोडसह वरच्या सर्व ओटीटी अॅप्सचा समावेश आहे.
खास म्हणजे, ग्राहक जिओ टीव्ही अॅपद्वारे सर्व OTT सेवांचा अॅक्सेस घेऊ शकतात. तसेच, पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मोफत दिला जातो. जिओचे हे प्लान्स अत्यंत किफायतशीर असून ते ग्राहकांना मनोरंजन आणि डेटाचा पुरेपूर फायदा करून देत आहेत.