हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून जिओकडे पाहिले जाते. हि कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन प्लॅन घेऊन येत असते. त्याचप्रमाणे आताही जिओने एका फायदेशीर प्लॅनची घोषणा केली आहे. ग्राहकांनाच्या गरजा लक्षात घेऊन हा प्लॅन बनवण्यात आला आहे. जर तुम्हाला जास्त व्हॅलिडिटीसह जिओचा प्लॅन हवा असेल, तर 90 दिवस व 200 दिवस व्हॅलिडिटीसह नवीन प्लॅन चांगला पर्याय ठरू शकतो. तर चला जाणून घेऊयात या फायदेशीर प्लॅनबदल अधिक माहिती.
जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी –
899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे . या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 100 एसएमएस मोफत दिले जातात. याशिवाय 20GB अतिरिक्त डेटा भेटणार आहे. म्हणजेच एकूण 200GB डेटा उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. दररोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट स्पीड 64kbps ने कमी होणार आहे. पण इंटरनेट सुरु राहील. याचसोबत JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud यासारख्या जिओच्या अँपचा फायदा ग्राहकांना मिळेल. या प्लॅनची दिवसाला सरासरी किंमत फक्त 10 रुपये आहे. त्यामुळे हा प्लॅन ग्राहकांना परवडण्याजोगा आहे.
2025 रुपयांचा न्यू ईयर वेलकम प्लॅन –
नवीन वर्षानिमित्त जिओने खास न्यू ईयर वेलकम प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 2025 रुपये असून याला 200 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. दररोज 2.5GB 4G डेटा, अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस या सर्व सुविधांचा ग्राहकांना मिळणार आहेत. यासोबत ग्राहकांना 2025 रुपयांपर्यंतच्या पार्टनर बेनिफिट्स मिळतील. या प्लॅनची दिवसाला किंमतही फक्त 10 रुपये असल्यामुळे ग्राहकांसाठी हा बजेटमध्ये मिळणार आहे.त्यामुळे जिओचे हे नवीन प्लॅन्स ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहेत.