Jio Prepaid Plans : नया साल नया प्लान; रोज 2.5 GB डेटा अन् बरंच काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे वर्ष संपायला अवघा 1 आठवडा राहिला असून लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक टेलीकॉम कंपन्या त्यांच्या यूजर्स साठी नवनवीन प्लान (Jio Prepaid Plans) आणत आहेत . मग त्यात जिओ (Jio) कस मागे राहील? रिलायन्स जिओने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपला हॅपी न्यू इयर प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये 2023 रुपये, 2999 रुपये, 2879 रुपये आणि 2545 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

Jio च्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजे एकूण 912GB डेटा. याशिवाय या प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची म्हणजे संपूर्ण वर्षभरासाठी आहे. या प्लॅनमध्ये 23 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध आहे आणि 75GB डेटा ऑफर केला जातो.

ज्या भागात Jio ची 5G सेवा सुरू झाली आहे, तेथे यूजर्सना या प्लॅनसह 5G डेटाचा फायदा मिळेल. Jio ची 5G सेवा दिल्ली-NCR, मुंबई, वाराणसी, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, गुजरातमधील अनेक जिल्हे आणि इतर शहरांमध्ये सुरू झाली आहे. 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी लोकांना कोणत्याही नवीन सिमची गरज नाही. याबाबत कंपनीने आधीच माहिती दिली आहे.

जिओने 2023 रुपयांचा सुद्धा प्लान ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लॅन 9 महिन्यांसाठी असून यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB हाय स्पीड डेटा मिळेल . इतकेच नाही तर जुन्या प्लॅनसोबतही ही ऑफर उपलब्ध असेल. या प्लॅनसह जिओ नवीन सदस्यांना मोफत प्राइम मेंबरशिप देखील देत आहे.