हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Recharge Plan – जर तुम्ही जिओचे यूजर असाल आणि कमी किमतीत बेस्ट कॉलिंग प्लॅन शोधत असाल, तर जिओचा 189 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या यूजर्सना विविध रेंजमध्ये डेटा आणि कॉलिंग प्लॅन्स ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटा यांसारखे फायदे मिळतील. त्यामुळे अनेक ग्राहक याकडे आकर्षित होणार आहेत . तर चला या 189 रुपयांचा प्लॅनबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Jio चा 189 रुपयांचा प्लॅन (Jio Recharge Plan) –
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स आहेत. त्यातील एक आकर्षक प्लॅन म्हणजे 189 रुपयांचा प्लॅन (Jio Recharge Plan) , ज्यामध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.या प्लॅनमध्ये अनेक फायदे आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना उत्कृष्ट सुविधा मिळवता येतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे, ज्याद्वारे तुम्ही देशातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल्स करू शकता. त्याचबरोबर, 300 एसएमएस ची मर्यादा आहे, ज्याचा उपयोग तुम्ही संपूर्ण व्हॅलिडिटीच्या कालावधीत विविध संदेश पाठवण्यासाठी करू शकता. तसेच 2GB हाय स्पीड डेटा देखील मिळतो, जो इंटरनेट सर्फिंगसाठी उपयुक्त आहे. या सर्व सुविधांसह, हा प्लॅन एकाच वेळी सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि डेटासाठी उत्तम पर्याय आहे.
मोफत सब्सक्रिप्शनचा लाभ –
या प्लॅनसोबत (Jio Recharge Plan) जिओ अँप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते, ज्यामुळे वापरकर्त्यांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, आणि जिओ क्लाऊडच्या मोफत सब्सक्रिप्शनचा लाभ मिळतो. यामुळे तुम्ही विविध मनोरंजन सेवा अगदी सहजपणे वापरू शकता. हा प्लॅन रिचार्ज करणे खूप सोपे आहे. तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइट, माय जिओ अँप , किंवा गुगल पे, फोन पे यांसारख्या ऑनलाइन पेमेंट अँप्सच्या माध्यमातून सहज रिचार्ज करू शकता. त्याच्या किमतीच्या तुलनेत मिळणारे फायदे अत्यंत आकर्षक आहेत, त्यामुळे हा प्लॅन अनेक यूजर्ससाठी एक आदर्श आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
हे पण वाचा : 50MP कॅमेरा, 5,500mAh बॅटरी; Poco X7 5G मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ