Jio Recharge Plan | Jio ने आणला नवीन रिचार्ज प्लॅन ; 200 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Recharge Plan | देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध ऑफर आणलेल्या आहेत. आता नवीन वर्ष सुरू होण्यास अगदी काही दिवसच शिल्लक आहेत. अशातच रिलायन्स जिओ नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार झालेले आहे. त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर लॉन्च केलेली आहे. ही ऑफर प्रीपेड प्लॅनची आहे. या ऑफरचा फायदा सगळ्या युजरला नक्कीच होणार आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला अनेक फायदे होणार आहेत. आता या रिचार्ज प्लॅनबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कोणता आहे रिचार्ज प्लॅन? | Jio Recharge Plan

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला 2.5 जीबी डेटाची ऑफर मिळते. तुम्ही दिवसभर हे नेट वापरू शकता. तसेच तुमच्या प्लॅनची वैधता 200 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. म्हणजेच जवळपास सात महिने तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. तसेच तुम्ही इंटरनेटचा देखील आनंद होऊ शकतो. त्याचप्रमाणे जिओ तुम्हाला या प्लॅनसह 2150 रुपयांची व्हॅल्यू बुक कुपन ऑफर करत आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.

यामध्ये तुम्हाला 2999 रुपयांच्या ऑर्डरवर 500 रुपयांची सुट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे इझी माय शोवर स्लाईड बुकिंग वर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. स्विगीवर 499 पेक्षा जास्त किमतीची तुमची ऑर्डर असेल तर तुम्हाला 150 रुपयांची सूट दिली जाणार आहे.

तुम्हाला देखील जर सतत ऑनलाईन शॉपिंगची तसेच ऑर्डर करण्याची आणि प्रवास करण्याची सवय असेल, तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटाचा कॉलिंगचा अनुभव घेता येईल. तसेच इतर अनेक सुविधांचा देखील अनुभव घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला माय जिओ ॲपच्या किंवा जिओच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती नवीन घ्यावी लागेल.