हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Jio Recharge Plan) किमतीत पुन्हा एकदा वाढ करत ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात जिओने रिचार्ज प्लॅन महाग केले होते, आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत ग्राहकांचे कंबरडं मोडले आहे. मात्र हे बदल नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत दिल्या जाणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आले आहेत. रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती Jio वेबसाइट आणि My Jio ॲपवर ग्राहक पाहू शकतात.
कोणकोणते रिचार्ज प्लॅन महागले – Jio Recharge Plan
जिओने आपल्या २ रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत त्यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे १०९९ रुपयांचा.. या प्लॅनमध्ये २०० रुपयांची वाढ झाली असून आता तुम्हाला १२९९ रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मोफत, दररोज २ gb इंटरनेट डेटा यांसारख्या सुविधा मिळतात. जिओचा हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच ८४ दिवस ग्राहकांना नेटफ्लिक्स चा लाभ घेता येतोय.
जिओचा दुसरा प्लॅन (Jio Recharge Plan) आहे तो म्हणजे १४९९ रुपयांचा…. या प्लॅनच्या किमतीत तब्बल ३०० रुपयांची वाढ करण्यात आली असून ग्राहकांना आता १७९९ रुपये मोजावे लागतील. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मोफत, दररोज ३ gb इंटरनेट डेटा यांसारख्या सुविधा मिळतात. जिओचा हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच ८४ दिवस ग्राहकांना नेटफ्लिक्स चा लाभ घेता येतोय.
दरम्यान, Jio ने याच वर्षी जुलैमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ केली होती. रिचार्जच्या किमती १२-२७ टक्के वाढवून कंपनीने ग्राहकांना दणका दिला होता. तसेच काही प्लॅनमध्ये असे बदल करण्यात आले होते की यूजर्स अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकत नाहीत. यासोबतच एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅनही महाग करण्यात आले आहेत. रिचार्ज महाग झाल्यानंतर यूजर्सना मोठा धक्का बसला आहे.अशा परिस्तिथीत देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL च्या सिमकार्डला ग्राहकांची मागणी वाढली आहे. स्वस्तात मस्त आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत बीएसएनएलचे रिचार्ज उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग तिकडे आकर्षित होऊ लागला आहे.