Jio Recharge Plan: वर्षभर चालणारा Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; किंमत अन फायदे जाणून घ्या

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Recharge Plan – रिलायन्स जिओ ( Jio Reliance ) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवीन अन सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेले रिचार्ज प्लॅन्स आणत असतात . आताही जिओने रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये नवीन अन धमाकेदार प्लॅन आणला आहे. ज्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना जास्त व्हॅलिडिटी , अनलिमिटेड कॉलिंग , एसएमएस , अन डेटा ऑफर केला जातो. यासोबतच विविध सेवाही प्रदान केल्या जातात. तर चला या रिलायन्स जिओच्या नव्या रिचार्जबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Jio चा जास्त व्हॅलिडिटीचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) –

युजर्ससाठी जिओने (Jio Reliance) 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन 3,999 रुपयांत उपलब्ध असून, युजर्सला 912.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 365 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. हा रिचार्ज प्लॅन मुख्यत: दीर्घकालीन डेटा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतो, कारण यामध्ये दिवसाला 2.5 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर, लो स्पीड डेटा ब्राउझिंग सुरु राहील. तसेच, युजर्सना 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल / टीव्ही सबस्क्रिप्शन आणि 50 जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेजची सुविधा दिली जाईल.

जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन –

या योजनेंतर्गत जिओ (Jio Recharge Plan) हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन एक मर्यादित कालावधीसाठी दिले जाते, ज्यामुळे युजर्सला नवीन चित्रपट, वेब सीरिज, आणि लाइव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतात. तसेच, युजर्सना त्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स आणि फोटोंसाठी 50 जीबी एआय क्लाउड स्टोरेजसुद्धा उपलब्ध होईल. विशेषत: जिओ मासिक योजनांच्या ग्राहकांसाठी, या फायदेशीर ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी प्लॅनची व्हॅलिडिटी संपल्यानंतर 48 तासांच्या आत रिचार्ज करणे आवश्यक आहे. हा रिचार्ज प्लॅन जिओ युजर्ससाठी आणखी एक सुविधाजनक आणि फायदेशीर पर्याय सिद्ध होईल.