Jio Recharge Plan | Jio ने आणला नवीन स्वस्त प्लॅन, मिळणार 11 महिन्यांची वैधता

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Recharge Plan | रिलायन्स जिओ ही आपल्या देशातील एक सगळ्यात लोकप्रिय टेलिफोन कंपनी आहेत. देशातील कितीतरी कोट्यावधी ग्राहक या कंपनीसोबत जोडलेले आहेत. जिओने जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. त्यामुळे त्यांच्या युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. परंतु आता याच युजर्सला जोडून आणि आकर्षित ठेवण्यासाठी जिओ नवीन प्लॅन आणत आहेत. जिओनी त्यांच्या लिस्टमध्ये आणखी एक नवीन प्लॅन आणलेला आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी या प्लॅनची किंमत असणार आहे. या जिओच्या नव्या प्लॅनची वैधता 11 महिन्यांची असणार आहे. आणि अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला वर्षभर टेन्शन राहणार नाही. आता प्लॅन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

जिओचा 1899 रुपयांचा प्लॅन | Jio Recharge Plan

जिओच्या या नवीन प्लॅन किंमत 1899 रुपये एवढी आहे. या प्लॅनची वैद्यता 11 महिन्यांची आहे. यामध्ये तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहे. तसेच युजरला 24 जीबीचा डाटा देखील मिळणार आहे. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज लागत नाही. त्यांच्यासाठी हा आपल्याला अत्यंत चांगला प्लॅन आहे. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही जिओ क्लाउड यांचा फ्री ऍक्सेस मिळणार आहे.

अशाप्रकारे जर तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त वैधता असलेला प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला असा प्लॅन आहे. तुम्ही एकदा प्लॅन घेतल्यावर 11 महिने तुम्हाला रिचार्ज करण्याची काहीच गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही कमी इंटरनेट डेटा वापरत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे. काही लोकांकडे घरात वायफाय असते. अशा लोकांना केवळ कॉलिंग साठी एखादा रिचार्ज प्लॅन पाहिजे असतो. त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उत्कृष्ट असा प्लॅन आहे.