हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल आणि कमी पैशात जास्त दिवसांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plans) शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणारे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा देण्यात येत आहे. एकदम 84 दिवसांसाठी हा रिचार्ज असल्याने सतत रिचार्ज करण्याची कटकट सुद्धा ग्राहकांना नसेल. मग चला तर जाणून घेऊयात, हे रिचार्ज प्लॅन किती किमतींचे आहेत.
जिओचा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन- Jio Recharge Plans
रिलायन्स जिओच्या 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या कालावधीत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 1000 एसएमएस, एकूण 6 GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतो. एवढच नव्हे तर एकद का डेटा लिमिट पूर्ण झाले तर मग 64Kbps वेगाने इंटरनेटचा आनंद घेता येईल. याशिवाय JioTV, JioCinema आणि JioCloud इत्यादी अनेक Jio ॲप्सच्या सुविधाही या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.
जिओचा ७९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन-
रिलायन्स जिओचा ७९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Jio Recharge Plans) सुद्धा 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस, आणि 1.5GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतो. याशिवाय ना JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या अनेक Jio ॲप्सची सुविधा देखील वापरकर्त्यांना मिळतात.
जिओचा ८५९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा ८५९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB इंटरनेट डेटचा फायदा मिळतो. ज्यांना जास्त इंटरनेटची आवश्यकता आहे अशा ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय आहे. ग्राहकांना या रिचार्ज प्लॅन सोबत JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या अनेक Jio ॲप्सचा आनंद घेता येईल. हा रिचार्ज प्लॅन सुद्धा 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येत असल्याने पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज यूजर्सना नाही.