‘जिओ’च्या ग्राहकांसाठी खूशखबर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी ।  रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने फ्री टॉकटाइम देण्याचा निर्णय घेतला आहे. या टॉकटाइमची मर्यादा फक्त ३० मिनिटे इतकी असणार आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा यासाठी जिओ कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागण्याचा निर्णय जिओने दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. जिओच्या ग्राहकांनी अन्य दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर व्हाईस कॉल केल्यास ग्राहकांना प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहे. यातून ग्राहकांना थोडा दिलासा मिळावा यासाठी कंपनीने आता हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान जिओची लिमिटेड मर्यादा ऑफर ही ४८ तासांपेक्षा कमी आहे. पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना कंपनीने मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा आपला फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ३० मिनिटांचा फ्री टॉकटाइम मिळणार आहे. या वन-टाइम ऑफर प्लानच्या घोषणेनंतर पहिल्या ७ दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे.

जिओने आऊटगोईंग साठी चार्ज लावल्यानंतर आणि याची तत्काळ अंलबजावणी ९ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. जिओच्या अंमलबजावणीनंतर जिओच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. जिओच्या या निर्णयानंतर ट्विटर व सोशल मीडियावर सुद्धा जिओच्या ग्राहकांनी जोरदार टीका केली आहे. अनेक ग्राहकांनी रिलायन्स जिओला तीन वर्षापूर्वी आपली सेवा सुरू करताना त्यांनी जे ग्राहकांना फ्री लाईफटाइम व्हाईस कॉलचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले आहे?, असे म्हणत त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment