JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । JioPOS Lite App : भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या पैकी एक असलेली Reliance Jio आपल्या युझर्सना JioPOS Lite App द्वारे पैसे कमविण्याची संधी देत आहे. या App च्या माध्यमातून आता युझर्सना घरबसल्या हवे तेवढे पैसे कमवता येतील. यासाठी त्यांना जास्त वेळ देण्याचीही गरज नाही. हे काम आपली नोकरी सांभाळूनही करता येईल. चला तर मग JioPOS Lite App कसे काम करते ते जाणून घेऊयात …

Google Play Store वरून JioPOS Lite डाउनलोड करा. याद्वारे ग्राहकांना Jio चा पार्टनर बनण्याची आणि प्रीपेड रिचार्ज करण्याची परवानगी मिळेल. यासाठी ग्राहकांना कमिशन देखील मिळेल. त्यासाठी रजिस्ट्रेशन करणेही अगदी सोपे आहे. तसेच यासाठी कोणत्याही फिजिकल व्हेरिफिकेशनची देखील गरज नाही. MyJio App किंवा जिओ वेबसाइटद्वारे आपल्याला इतर जिओ नंबरचे रिचार्ज करता येईल.

JioPOS Lite App पार्टनर्सना रिचार्ज करण्यासाठी 4.16 टक्के कमिशन देत आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या जिओ अकाउंटचे रिचार्ज करता येईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्याकी, JioPOS Lite App वर Jio पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे Jio कनेक्शन असायला हवे.

JioPOS Lite for Android - APK Download

रजिस्ट्रेशन केल्यानंतर, हे App तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यास सांगेल ज्यामधून ते रिचार्जची रक्कम कट करेल. आपण जेव्हा कोणत्याही नंबरचे रिचार्ज करू तेव्हा आपल्याला 4.16 टक्के कमिशन मिळेल. समजा आपण 100 रुपयांचा रिचार्ज केला तर आपल्याला 4.166 रुपये परत मिळतील.

अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करा :

त्यासाठी सर्वात आधी Android स्मार्टफोनवर JioPOS Lite App डाउनलोड करा.
यानंतर App उघडा आणि App ला तुमचे कॉन्टॅक्ट, लोकेशन आणि फाइल्सना परवानगी देण्यासाठी ‘Allow All’ वर क्लिक करा.
आता, ‘साइन अप’ वर क्लिक करा.
यानंतर ईमेल आणि जिओ मोबाईल नंबर टाका.
आता, ‘जनरेट OTP’ वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला मिळालेला OTP एंटर करा आणि ‘Validate OTP’ वर क्लिक करा.
आता लोकेशन निवडा आणि Done वर क्लिक करा.
त्यानंतर Done वर अजून एकदा क्लिक करा.
आता, साइन इन प्रक्रिया सुरू करा आणि तुमचा नंबर एंटर करा.
यानंतर तुमच्या आवडीचा 4 अंकी MPin टाका.
आता सेटअप वर टॅप करा.
आता तुम्ही तुमची कमाई, पासबुक, तुमच्या खात्यातील पैसे आणि इतर सर्व डिटेल्स फ्ता येतील.
‘Load Money’ तुम्हाला तुमच्या खात्यात कोणतीही रक्कम लोड करण्याची परवानगी देते.
यानंतर, जर तुम्ही कोणाचेही रिचार्ज केले तर या रकमेतून पैसे कापले जातील आणि तुम्हाला तुमचे कमिशन मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.jio.com/

JioPOS Lite app will let you earn money on recharging other numbers, here's  how | 91mobiles.com

हे पण वाचा :

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Vi Prepaid Plan : फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

Leave a Comment