Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन!! फक्त 119 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन 1.5 GB डेटा

jio recharge 119 plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट, SMS यांचा समावेश असतो. इंटरनेट डेटा आणि व्हॅलिडिटी यानुसार प्लॅन्स ची किंमत ही वेगेवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात रिचार्ज प्लॅन बाबत सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त 119 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन 1.5 GB डेटाचा फायदा घेता येतोय….

Jio आपल्या युजर्ससाठी फक्त 119 रुपयांमध्ये खुश करत आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 1.5 GB डेटा आणि 300 मोफत एसएमएस यांसारख्या सुविधा मिळतात . येव्हडच नव्हे तर या प्लॅनवर रिचार्ज केल्यावर तुम्हाला JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. Jio चा सर्वात परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे. परंतु या प्लॅनची ​​वैधता केवळ 14 दिवसांसाठी आहे. त्यामुळे फक्त 14 दिवसांसाठी तुम्हाला या प्लानचा फायदा मिळेल.

Jio च्या अन्य रिचार्ज बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 199, Rs 239, Rs 259, Rs 479, Rs 666 आणि Rs 2545 चा समावेश आहे. यामधील 199 प्लॅनची ​​वैधता 23 दिवस आहे. तर 239 च्या रिचार्ज ची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तर दुसरीकडे जीओचा २ महिन्याचा प्लॅन 259 रुपयांना आहे. आणि 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन 666 रुपयांना मिळतो.