हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओ (Reliance Jio) नेहमी वेगवेगळ्या किमतीतील आणि व्हॅलिडिटीचे प्लॅन घेऊन येत असते. ते आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. पण काही दिवसांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमतींमध्ये 30% ची वाढ केली होती. याशिवाय रिचार्ज प्लॅनसोबत मिळणाऱ्या OTT फायद्यांमध्येही घट केली होती. त्यामुळे अनके ग्राहक नाराज झाले होते. पण आज आम्ही तुम्हाला जिओचा असा प्लॅन सांगणार आहोत , ज्यामध्ये तुम्हाला सर्व सेवा सुविधा मिळणार आहेत. तर चला जाणून घेऊयात या प्लॅन बदल सविस्तर माहिती.
जिओचा 448 रुपयांचा प्लॅन –
जिओचा हा प्लॅन ग्राहकांना 448 रुपयांना उपलब्ध होणार असून , या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB सुपरफास्ट डेटा दिला जातो, ज्यामुळे एकूण 28 दिवसांमध्ये 56GB डेटा वापरता येतो. डेटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते . या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते, ज्यामुळे कॉलिंगच्या बाबतीत कोणताही अडथळा निर्माण होत नाही .याचसोबत प्रत्येक ग्राहकाला दररोज 100 SMS मोफत मिळतात. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये 12 OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शनही समाविष्ट आहे, ज्यामुळे ग्राहकांना मनोरंजनासाठी विविध अॅप्सचा वापर करण्याची सुविधा मिळते.
12 OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन –
जिओच्या 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते, ज्यात प्रमुख अॅप्स समाविष्ट आहेत जसे की JioCinema Premium, Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, आणि FanCode. या सब्सक्रिप्शन्सद्वारे ग्राहकांना विविध प्रकारचे मनोरंजन, मूव्हीज, शोज आणि स्पोर्ट्स पाहता येतात. तसेच जिओच्या 5G नेटवर्कचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक खास सुविधा आहे. ज्या भागात जिओचे 5G नेटवर्क उपलब्ध आहे, तिथे डेटा संपल्यानंतरही ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि वापरकर्ता अनुभव अजून चांगला होतो.